इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उसळलेला हिंसाचार शांत होत जनजीवन पूर्वपदावर आले असतांना, सोमवारी पुन्हा एकदा राजधानी

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उसळलेला हिंसाचार शांत होत जनजीवन पूर्वपदावर आले असतांना, सोमवारी पुन्हा एकदा राजधानी इम्फाळमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. इम्फाळच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट भागात जमावाने काही घरे पेटवून दिल्याचे समोर आले आहे.
हिंसाचारानंतर लष्कर आणि निमलष्करी दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाचारण करण्यात आले. तसेच संचारबंदी वाढवण्यात आली असून इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. इम्फाळच्या अरसन भागात जमावाने काही घरे आणि परिसरात जाळपोळ केली. यामुळे इथे आधीच सुरु असलेल्या संचारबंदीच्या वेळेत वाढ करण्यात आली. आधी सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत इथे संचारबंदी शिथील करण्यात आली होती. त्यात बदल करुन ती आता सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत थिथील करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवांवरील बंदी आणखी पाच दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता राज्याची राजधानी इम्फाळमधील न्यू चेकोन भागात मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये भांडण झाले. स्थानिक बाजारपेठेत जागेवरून हाणामारी सुरू झाली. परिसरात जाळपोळ झाल्याच्या वृत्तानंतर पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. आठवड्याभरापासून सुरु असलेल्या इथल्या हिंसाचारातील मृतांचा अधिकृत आकडा 74 वर पोहोचला आहे. मणिपूरमध्ये एका महिन्याहून अधिक काळ विविध मुद्द्यांवरून समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे.
मणिपूरमध्ये आदिवासींनी 3 मे रोजी एकता मोर्चा काढल्यानंतर माईतींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी संघर्ष सुरू झाला. आठवडाभराहून अधिक काळ चाललेल्या या हिंसाचारात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेला आग लागली आणि हजारो लोकांना सरकारी मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. कुकी ग्रामस्थांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे याआधीही अनेक चकमकी झाल्या होत्या, ज्यामुळे अनेक छोटी आंदोलने झाली होती.
COMMENTS