Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांची पोलिस भरतीत निवड

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील बाळासाहेब महारनवर, निलेश साठे व  तुषार शिंदे हे तीन व

टीईटी घोटाळ्यात नगर जिल्ह्यातील 149 शिक्षक
पुण्यातील 3 पोलिसांनी 45 लाख लुटलं | DAINIK LOKMNTHAN
श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व ः हभप सखाराम महाराज

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील बाळासाहेब महारनवर, निलेश साठे व  तुषार शिंदे हे तीन विद्यार्थी महाराष्ट्र पोलीसमध्ये नूकतेच भरती झाले आहेत. मुंबई येथे मेरिट लिस्टनूसार त्यांचे सिलेक्शन झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाच्या मूलांनी मिळविलेल्या यशाबद्दल  प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिकचे वाघ व सहायक समाज कल्याण अधिकारी अहमदनगर राधाकिसन देवढे, सहायक लेखाधिकारी राहुल गांगडे, वसतिगृह निरिक्षक जाधव मँडम व वसतिगृहाचे गहपाल अनिल गजें यांनी अभिनंदन केले आहे व तसेच माजी मंत्री आ. प्रा राम शिंदे व आ. रोहित पवार रोहित यांनी देखील या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे लिपीक मधुकर महानुर मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. वस्तीगृहातील पोलिस भरती झालेल्या या मुलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS