Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदी अतुल लोखंडे

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी निवडणूक घेण्यात आली यात, राष्ट्रवादी काँगे्रसचे अतुल लोखंडे यां

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेटमध्ये अजिंक्य
अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
कलाकार प्रमोद पंडित यांचा नरहरी सेनेच्या वतीने सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी निवडणूक घेण्यात आली यात, राष्ट्रवादी काँगे्रसचे अतुल लोखंडे यांनी बाजी मारत त्यांची सभापतीपदी तर, उपसभापतिपदी मनीषा योगेश मगर यांची निवड झाली. अठरापैकी 10 मते मिळवून निवड झाली, तर सभापतिपदासाठी काँग्रेस-भाजपचे प्रशांत ओगले, तर उपसभापती पदासाठी लक्ष्मण नलगे यांना प्रत्येकी 8 मते मिळवून दारुण पराभव झाला. यामुळे भाजपचे खासदार सुजय विखे यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. यामुळे श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक गुरुवारी सहकारी संस्था निबंधक कार्यालयात मतदान प्रक्रियेनुसार पार पडली. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने 11 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला 7 जागा मिळाल्या होत्या. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लोखंडे यांची सभापतिपदी वर्णी लागली, तर उपसभापतीपदी मनीषा योगेश मगर या निवडून आल्या. काँग्रेसचे प्रशांत ओगले आणि भाजपचे लक्ष्मण नलगे यांचा दारुण पराभव झाला. बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत जगताप यांचे संचालक फोडण्यासाठी अख्या तालुक्यातील विरोधी नेते नडले. पण माजी आमदार राहुल जगताप यांनी सर्वांना मागे टाकत श्रीगोंदे बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची सभापती व उपसभापतीपदी वर्णी लावली.

COMMENTS