Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण

पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याची मागणी

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने सर्व्ह

दुधोडीतील कार्यकर्त्यांचा आ. रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
त्या दोन ’भोंदू’ बाबांच्या वक्तव्याचा निषेध ः आ.रोहित पवार
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने सर्व्हेक्षण होवून औद्योगिक विकास विभागामार्फत भू-निवड समितीची स्थळ पाहणी, ड्रोन सर्वेक्षण व उच्चाधिकार समितीच्या बैठकीची मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाली होती. 143 व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने जुलै 2022 मध्ये मान्यताही दिली होती. मात्र अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. आ. पवार यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला, उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन अधिसूचना जाहीर करण्याबाबत पाठपुरावाही केला. त्यावर मंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्‍वासित केले. मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने आ. रोहित पवार यांनी युवा वर्ग, ग्रामस्थ यांना सोबत घेवून सामंत यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
आ. पवार यांनी म्हटले आहे, मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांची या संदर्भात भेट घेतली आहे. पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी जाहीर करून इतर कायदेशीर बाबी या राजश्री शाहू महाराज जयंती 26 जून 2023 पर्यंत पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत जर याबाबत ठोस निर्णय होऊन कर्जत जामखेडमधील जनतेवर राजकिय द्वेशापोटी होणारा अन्याय दूर झाला नाही तर 26 जून 2023 पासून सर्व नागरिक, युवा वर्गासह हजारोंच्या संख्येने या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहोत. उद्योग व्यापाराचे महत्त्व ओळखून उद्योगांना अनेक सवलती देऊन चालना देणार्‍या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र मंजूर असूनही केवळ राजकीय द्वेषातुन अधिसूचना झालेली नसल्याने येथील जनतेवर अन्याय होत आहे. ही बाब मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली आहे. माझ्या मतदारसंघातील युवा वर्गासाठी व नागरिकांसाठी उपोषण करण्याची वेळ आली तर मी त्याला तयार आहे. केवळ राजकीय द्वेषातून मंजूर झालेली एमआयडीसी ही फक्त पुढे-पुढे ढकलून सामान्य लोकांवरच अन्याय होतोय हे सत्तेत असलेल्या लोकांनी लक्षात घ्यावे, असेही आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS