Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून 35 हजारांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी - इन्स्टाग्रामवरील ओळखीतून लंडनहून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांनी एका तरुणीस 35 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याच

पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा
टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने 83 लाखांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी – इन्स्टाग्रामवरील ओळखीतून लंडनहून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांनी एका तरुणीस 35 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फसवणूक झालेली तरुणी ही शहरातील गोविंदनगर भागात राहते. दि. 1 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत संशयित मिघुल ऑयजिन व मुजायद्दीन खान (दोघांचेही पूर्ण पत्ते माहीत नाहीत) यांनी संगनमत करून फिर्यादी तरुणीशी इन्स्टाग्रामवरून ओळख करून घेतली. त्यानंतर या तरुणीचा विश्‍वास संपादन करीत वेस्ट लंडनहून सोन्याचे दागिने, घड्याळे, पर्स आदी भेटवस्तू पाठविण्याचे सांगितले. त्याबदल्यात 35 हजार रुपयांची रोख व ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने ही रक्कम संशयितांच्या सांगण्यावरून त्यांच्या खात्यावर पाठविली; मात्र बरेच दिवस उलटूनही सांगितल्याप्रमाणे वस्तू आल्या नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत

COMMENTS