Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती शहरामध्ये जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न

दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

अमरावती प्रतिनिधी - अकोला येथे सोशल मीडिया वर धार्मिक  पोस्ट व्हायरल केल्यामुळे दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होऊन त्याठिकाणी जातीय दंगल घडली हो

लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान करणार्‍याला अटक
गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे
साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता 40 कोटीचा निधी मंजूर

अमरावती प्रतिनिधी – अकोला येथे सोशल मीडिया वर धार्मिक  पोस्ट व्हायरल केल्यामुळे दोन समुदायामध्ये तणाव निर्माण होऊन त्याठिकाणी जातीय दंगल घडली होती. अमरावतीत सुद्धा दोन राजकीय पदाधिकाऱ्यांनी काल सोशल मीडियावर आपत्ती जनक कर्नाटक राज्यातील जुना व्हिडिओ व्हायरल करून जसे काही तो अमरावती शहरामधील आहे असे दर्शविले आणि अमरावती शहरामध्ये एका विशिष्ट समुदायाचे ५०० ते १००० लोक जमा झालेले आहेत आणि त्यामुळे येथे सुद्धा दंगल होण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारचा प्रयास केल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. यात अमरावतीच्या गाडगे नगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये काँग्रेस पक्षाने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, तात्काळ अमरावतीत टाकलेल्या पोस्ट प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली. तर अमरावतीत कोणीही चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नये अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

COMMENTS