वर्धा प्रतिनिधी - अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
वर्धा प्रतिनिधी – अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाचे वतीने नागपुर विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेचा शासन निर्णय तत्काळ काढणे . ओबीसी विद्यार्थी विद्यार्थींनींची महाराष्ट्रातील शासकीय ७२ वसतीगृहे राज्यातिल ३६ जिल्ह्यांमधे जिल्हाधिकारी व मा. सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत या शैक्षणिक सत्रापासुन सुरू करणे, तसेच नविन ओबीसींची ३६ जिल्ह्यातील ओबीसींची शासकीय वसतीगृहे बांधण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देणे यासह अश्या विविध मागण्या करिता प्रा. दिवाकर गमे राज्य उपाध्यक्ष महात्मा फुले समता परीषद यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS