किनवट प्रतिनिधी - येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशप
किनवट प्रतिनिधी – येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्या बद्दल कौतुक होत आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण 16 शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील इयत्ता 6 वी साठी 21 विद्यार्थी, 7 वी साठी 10 विद्यार्थी , 8 वी साठी 9 विद्यार्थी, 9 वी साठी 6 विद्यार्थी असे एकूण 46 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले असून इयत्ता 6 वी साठी 14 विद्यार्थी, 7 वी साठी 1 विद्यार्थी व 9 वी साठी 3 विद्यार्थी असे एकूण 18 विद्यार्थी प्रतिक्षा यादीमध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रकल्प अधिकारी नेहा भोसले(भाप्रसे) यांनी स्वत: या प्रवेशपूर्व परीक्षेकडे व्यक्तिश: लक्ष देऊन प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळांतील इयत्ता पाचवीचे सर्व विद्यार्थी व क्षमता चाचणी परीक्षा 2022-23 मध्ये इयत्ता सहावी व सातवीमध्ये प्रथम श्रेणीत आलेले सर्व विद्यार्थी या परीक्षेस बसविण्याबाबत कार्यवाही केली होती. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांचे प्रकल्पातील पालकांकडून विशेष आभार व्यक्त केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून महाराष्ट्र राज्यात एकूण 37 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कार्यरत असून अमरावती आदिवासी विकास विभागामध्ये सहस्त्रकुंड, बोटोणी, चिखलदरा व धारणी या चार शाळा कार्यरत आहेत. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थांना इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतचा सीबीएसई अभ्यासक्रम निःशुल्क शिकायला मिळतो. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडू शकतात.
COMMENTS