Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुभंगलेली मने जुळवण्याचे काम न्या. नेत्रा कंक यांनी केले

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांचे प्रतिपादन

अहमदनगर/प्रतिनिधी ः योग्य न्याय निवाड्यासाठी न्यायाधीश परिपक्व, समजूतदार व अभ्यासू  असावा. हे सारे गुण कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कं

सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
जिल्ह्यात भयानक स्थिती, पण सरकारचे दुर्लक्ष ; माजी मंत्री शिंदेंचा आरोप
पाटेगाव-खंडाळा ‘एमआयडीसी’ला जुलै अखेर मान्यता

अहमदनगर/प्रतिनिधी ः योग्य न्याय निवाड्यासाठी न्यायाधीश परिपक्व, समजूतदार व अभ्यासू  असावा. हे सारे गुण कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांच्यात आहेत. नवे न्यायाधीश बहुदा पहिल्या नियुक्तीत चाचपडतच असतात. नेत्रा कंक यांनी आपल्या पहिल्याच नियुक्तीत फार उत्कृष्ट काम केले आहे. कुटुंब व्यवस्था अबाधित राहण्यासाठी कौटुंबिक खटले त्यांनी नाजूकपणे हाताळले आहेत. जुन्या कोर्टात कौटुंबिक न्यायालयाची इमारत असल्याने भग्न झाली आहे. अशा भग्न इमारतीती दुभंगलेल मने व कुटुंब परत जुळवण्याचे अवघड काम न्यायाधीश नेत्रा कंक यांनी सहजपणे केले आहे. न्यायदान प्रक्रियेत वकिलांचे बहुमोल योगदान असते. कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे काम व उपक्रम कौतुकास्पद आहे. या न्यायालयाचे जे प्रलंबित समस्या व प्रश्‍न आहेत ते सोडवण्यासाठी सहकार्य करू, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी केले.
            कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांची नुकतीच सोलापूर येथे बदली झाली आहे. यानिमित्त कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते न्या.कंक यांचा सत्कार करून भारावलेल्या वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित देशमुख, कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी कराळे, उपाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण कचरे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, लॉयर्स सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड.भूषण बर्‍हाटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, पोलीस कर्मचारी श्री.फाळके व पूजा पवार यांचीही बदली झाल्याने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
            न्या.नेत्रा कंक म्हणाल्या, न्यायाधीश झाल्यावर पहिलेच पोस्टिंग असल्याने मनावर मोठे दडपण होते. पण येथील मनमोकळे वातावरण, सहकार्य करणारे वकील व कर्मचार्‍यांमुळे दडपण दूर झाले. येथे खूप काही शिकण्यास मिळाले, योग्य न्यायनिवाडा करता आला यासाठी न्यायदेवतेला धन्यवाद देता. येथील वकील संघ खूप उपक्रमशील आहे. समुपदेशक सुषमा बिडवे यांनी खूप सहकार्य केले. त्यामुळेच चांगले काम करू शकले. या माहेरचा आशीर्वाद घेवून सासरी जात आहे. हे माहेर कधीच विसरणार नाही.न्या.अभिजित देशमुख म्हणाले, न्या.नेत्रा कंक यांचे न्यायदानाचे काम अव्वल दर्जाचे आहे. पहिलेच पोस्टिंग असूनही त्यांनी केलेल्या कामातून बेंच मार्क उभारला आहे. न्या.कंक यांच्या जागेवर जे न्यायाधीश येतील त्यांना ते दिशादर्शक राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघटनेच्या सचिव अ‍ॅड.अनिता दिघे यांनी केले. विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी आभार मानले. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अ‍ॅड.सुचेता बाबर, एम.बी.आंबेकर, अ‍ॅड.करुना शिंदे, शहर वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड.राजेश कावरे, अ‍ॅड.गोरख तांदळे, अ‍ॅड.सुधीर भागवत, अ‍ॅड. राजेंद्र सेलोत आदींसह वकील वर्ग उपस्थित होते.

COMMENTS