Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी हिताच्या योजनांना आडकाठी

आमदार प्राजक्त तनपुरे यांची राज्य सरकारवर टीका

राहुरी/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत माजीमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी पुन्हा उद्विग्नपणे सोशल मीडियावर फे

मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत
राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्‍न तात्काळ सोडवा
दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकर्‍याकडे दुर्लक्ष

राहुरी/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत माजीमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी पुन्हा उद्विग्नपणे सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी हितांच्या योजनांना आडकाठी करत असल्याची खरमरीत टीका केली. या सरकारला शेतकर्‍यांप्रती काही घेणे देणे नसून, त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यास विलंब केला जात असल्याचा घणाघाती आरोप तनपुरे यांनी केला आहे. सोशल मीडियावर तनपुरे यांच्या या कृतीमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार होते, नंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार आठ महिन्यांपूर्वी राज्यात आले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत तत्कालीन ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री असलेले व उच्च शिक्षण प्राप्त झालेले राहुरीचे माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अथक परिश्रम व प्रयत्नातून राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऊर्जा प्रकल्प मंजूर करून घेतला.
बाबुळगाव, आरडगाव येथील पंचक्रोशीतील गावांना व ग्रामस्थांना एकत्र करीत या योजनेचे महत्त्व पटवून सांगितले. ग्रामस्थांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपापल्या जमिनी देण्याची तयारीही दर्शवली. गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांना रात्रीची वीज मिळत असल्याने आणि वन्य पशु प्राण्यांचा त्रास होत असल्याने असा प्रकल्प व्हावा, अशी मागणी होती. ही पूर्णत्वाकडे होत असतानाच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. उपमुख्यमंत्री व अनेक खात्यांचा कारभार असणारे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक घोषणा केल्या. यावरच माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष करून बाभूळगाव नंतर आरडगाव येथील या योजने संदर्भात सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह करून सर्वांचेच लक्ष वेधले. गतिमान शासनाचे वल्गना करणारे शासन शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्याच्या केवळ घोषणा करताना शेतकरी हिताच्या योजनांना अडकाठी आणत असल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

COMMENTS