Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत डीजे दणाणला

डीजे चालक-मालकासह दहा जणांविरुध्द कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः - स्वराज्यक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त नगर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातुन छत्र

मालेगाव येथील सिक सिग्मा हाँस्पिटल मध्ये कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांची धाड l पहा LokNews24
श्री संत निळोबाराय दिंडीचे उद्या प्रस्थान
नागवडे कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे देयके अदा

अहमदनगर/प्रतिनिधी ः – स्वराज्यक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त नगर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातुन छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकी दरम्यान, मिरवणूकीत सहभागी असलेल्या मंडळांनी शासकीय नियम डावलून डिजे लावल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दहा जाणांविरुध्द गुन्हयाची नोंद करण्यात आली.
शहरासह उपनगरातील विविध मंडळाने या मिरवणूकीमध्ये भाग घेतला होता. मिरवणूकी दरम्यान पोलिस प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आटी व शर्तीसह परवागनी दिली होती. मिरवणूकी दरम्यान कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता, मिरवणूकीत लावलेल्या डिजे चालक मालकांनी डिजेचा क्षमतेपेक्षा आवाज करुन डिजेचे कर्कश आवाजात गाणे लावले. पोलिसांनी त्यांना वेळीच डिजेचा आवाज कमी करण्या बाबत सांगितले असता. त्यांनी पोलिसाचीं म्हणणे न एकता शासन आदेशाचा भंग केला ही घटना इंपरिअल चौक ते कापडबाजार दरम्यान, घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कॉस्टेबल अभय कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डिजे चालक मालक आदेश रविंद्र लांडे (रा.मल्हार चौक), राहुल मोहन गायकवाड (भवानीपेठ पुणे), प्रेरणा प्रतिष्ठान वाडीयापार्कचे तालीम, टायगर ग्रुप संयुक्त मंडळाचे अध्यक्ष युवराज छबु पाचारणे (रा.टिळकरोड) व डिजे चालक अमोल छबु पुणेकर (रा.फुलसांगी, हवेली, पुणे), धर्मस्त युवा प्रतिष्ठाण अध्यक्ष यश सुधिर सोहत्रे (रा.भुषणनगर, केडगाव), डिजे चालक मालक तुषार शरद विधाते (माळीवाडा), जनता गॅरजे मित्र मंडळाचे आतिष विठ्ठल शिरसाठ (गांधी नगर बोल्हेगाव), गणेश तुकाराम मोरे (हडपरस पुणे,), अखंड नालेगाव ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष मयुर शाम साठे (नालेगाव) व डिजे चालक अर्जुन निकम (रा.शेरे कर्‍हाड) यांच्या विरुध्द भादवी कलम 188, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3, 15 ध्वनी प्रदुषण अधिनियम 200 चे कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. पुढील कारवाई कोतवाली ठाण्याच्या महिला पोलिस नाईक कविता गडाख या करत आहेत.

COMMENTS