Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीरा भाईंदरमध्ये आता रस्ते-पदपथ राहणार चकाचक

मीरारोड/प्रतिनिधी : मीरा भाईंदर मधील रस्ते-पदपथ नियमित चकाचक ठेवण्यासाठी आमदार गीता भरत जैन यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या विशेष निधीतून खरे

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारा अटकेत
महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : मुख्यमंत्री ठाकरे

मीरारोड/प्रतिनिधी : मीरा भाईंदर मधील रस्ते-पदपथ नियमित चकाचक ठेवण्यासाठी आमदार गीता भरत जैन यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या विशेष निधीतून खरेदी करण्यात आलेल्या बॅटरीवरील 12 सक्शन यंत्र वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. मीरा भाईंदर महापालिका ठेकेदारा मार्फत शहरातील रस्ते – पदपथ सकाळी एकदा झाडले जातात. मात्र त्या नंतर देखील दिवसभर बेशिस्त आणि बेजबाबदार लोकां कडून रस्ते-पदपथावर कचरा टाकला जातो. त्यामुळे रस्ते-पदपथ वर कचरा पडलेला दिसतो. आमदार गीता जैन यांनी शहरातील रस्ते व पदपथ यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने नियमित व्हावी यासाठी बॅटरी ऑपरेटेड मोटर सॅक्शन मशीन गोब्ब्लर खरेदीसाठी राज्य शासनाने निधी द्यावा यासाठी पाठपुरावा चालवला होता. शासनाने मुलभूत सोयी सुविधाचा विकास या योजने अंतर्गत महानगरपालिकेस सदर यांत्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 2 करोड 40 लाख रुपये उपलब्ध करून दिले होते.
त्यानुसार महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीसाठी अशी 2 यंत्र या प्रमाणे 12 यंत्र खरेदी केली आहेत. एका यंत्राची किंमत 20 लाख 50 हजार इतकी असून हि यांत्रिक सफाई वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आ. जैन यांच्यासह आयुक्त दिलीप ढोले यांनी त्याचे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त रवी पवार व संजय शिंदे, शहर अभियंता दीपक खंबीत, जनसंपर्क अधिकारी राज घरत, माजी नगरसेवक शरद पाटील, ओमप्रकाश गारोडिया, रिटा शाह, अश्‍विन कसोदरिया सह डॉ.सुरेश येवले, नारायणन नंबियार, अजय त्रिपाठी, कमलेश मजेठीया, किशोर भट्ट, अतुल ठाकूर आदी उपस्थित होते. सदर यांत्रिक वाहन बॅटरीवर चालणार आहे. त्याला एक सक्शन पंप असून त्या द्वारे काँक्रीट पासून गवतापर्यंत तसेच लाकूड, प्लास्टिक, कागद, धातू व काचेचे तुकडे , धूळ आदी ओढले जाऊन वाहनात बसवलेल्या कचर्‍याच्या डब्यात गोळा होणार आहे. सदर यांत्रिक सफाई वाहनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच ठेकेदार कंपनीच्या मार्फत सदर यंत्र चाळण्या बाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या वाहनांनी दिवसातून अधिकवेळा रस्ते-पदपथ स्वच्छ केले जाणार असल्याने शहरातील रस्ते चकाचक राहतील अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS