अहमदनगर प्रतिनिधी- धावपळ व तणावपूर्ण जीवनात आरोग्याची वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तपासण्या ग
अहमदनगर प्रतिनिधी- धावपळ व तणावपूर्ण जीवनात आरोग्याची वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तपासण्या गरजेचे आहे. आरोग्याबाबत कंटाळा व दुर्लक्ष केल्यास तो आजार जीवावर बेततो. वेगवेगळे आजार वाढत असताना सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी विविध मोफत शिबिराचे आयोजन आवश्यक बनले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस व नगर डॉक्टर्स सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर रोड येथील कमलाबाई नवले हॉलमध्ये घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, उद्योजक अमोल गाडे, शिबिराचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, उपाध्यक्ष कुमार नवले, अॅड. मंगेश सोले, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, डॉ. केतन गोरे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. आदिती पानसंबळ, डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. महेश कोकाटे, डॉ. हेमंत सोले, लक्ष्मीकांत पारगावकर, आशुतोष पानमळकर, ओंकार म्हसे, मयुर रोहोकले, रविंद्र राऊत, अनिकेत पानमळकर, साहिल पवार, दिपक गोरे, अभिजीत खरात, धीरज लोहारे, निहाल जाधव, अमोल बले, केतन गोरे, अभिजीत सपकाळ, भूषण पवळे, केतन धवन, मयूर टिंडावनी, मंगेश जोशी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, आरोग्य सुविधा ही खर्चिक बाब सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नसून, त्यांना शिबिराच्या माध्यमातून आधार मिळत आहे. समाज रोगमुक्त होण्यासाठी आरोग्य चळवळ उभी राहण्याची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. झपाट्याने ऋतुमान बदलत असून, आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्याप्रती जागरुक राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपनगरात शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालया समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
डॉ. सुदर्शन गोरे यांनी शिबिराच्या माध्यमातून सावेडी उपनगरात गरजू रुग्णांना सर्वच आरोग्याच्या तपासण्या व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सांगितले. घनश्याम सानप यांनी आरोग्य शिबिर काळाची गरज बनली आहे. महागाईच्या काळात हे शिबिर सर्वसामान्य रुग्णांना आधार ठरत असल्याचे स्पष्ट केले.
या शिबिराला सावेडी उपनगरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कृत्रीम दंतरोपण, दंत विकार तपासणी, स्त्रीरोग तपासणी, होमिओपॅथी तपासणी, जनरल फिजिशियन व सर्व रक्त तपासण्या करण्यात आल्या. तर आहारवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष पानमळकर यांनी केले. आभार अॅड. मंगेश सोले यांनी मानले.
COMMENTS