Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात बस दरीत कोसळून 15 जणांचा मृत्यू

भोपाळ/वृत्तसंस्था : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 8.30 वाजता भरधाव बस 50 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघ

गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 
बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार
भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू

भोपाळ/वृत्तसंस्था : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 8.30 वाजता भरधाव बस 50 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात बसमधील 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रशासनासह बचावकार्य सुरू केले.
यासंदर्भातील माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव-दसंगा या दरम्यान असलेल्या बुढार नदीवरील पुलावरून भरधाव बस जात होती. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव बस पुलाचा कठडा तोडून 50 फूट खोल नदीत कोसळली. कोरड्या नदीत बस कोसळल्याने जोराचा आवाज झाला. बसमधील 15 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. त्यानंतर अपघातग्रस्त बसला नदीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. खरगोन येथील बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच बस अपघातात गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. खरगोनमधील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर शासकीय खर्चाने मोफत उपचार करण्याचे असल्याचे निर्देश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत.

COMMENTS