Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वुमेन्स टेलरिंग बॅचचा शुभारंभ

बीड प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड, (एस. बी. आय. आरसेटी बीड) या ठिकाणी वुमेन्स टेलरिंग, महिलांकरिता,30 द

पारधी कुटुंबीयांना हक्काचा  निवारा द्या-डॉ.संजय तांदळे
चाकूचा धाक दाखवून सुमारे 50 हजाराचे सोन्याचे दागिने लुटले
खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा

बीड प्रतिनिधी – भारतीय स्टेट बँक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड, (एस. बी. आय. आरसेटी बीड) या ठिकाणी वुमेन्स टेलरिंग, महिलांकरिता,30 दिवस, या प्रशिक्षण वर्गाचे चे आयोजन करण्यात आले,या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घघाटन त्रिवेणी भोंदे, जिल्हा व्यवस्थापक,  एम. एस. आर. एल.एम. बीड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण साहित्य , कात्री,रिळ, बॉबीन,टेप, पट्टी, चोक, गणवेश इत्यादी वाटप केले. महिलांनी स्वतःचे कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हावे, आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवावे, संघर्ष हा प्रत्येक पावलावर असतो,तरी आपण न डगमगता पुढे वाटचाल करावी लागते. उद्योजकच आपली सर्व स्वप्न साकार करू शकतो, आपण देखील प्रशिक्षण पूर्ण करून उद्योजक होवू शकता , अनेक उद्योजकाचे उदाहरण, दाखले, त्यांनी दिले. भारतीय स्टेट बँक आर. से. टी. द्वारे  अनेक प्रकारचे मोफत, निवासी प्रशिक्षणाचे आयोजन, ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील युवक महिलांसाठी केले जाते, याचा लाभ बीड जिल्ह्यातील बेरोजगार युवक, महिलांनी लाभ घेण्याचे , आर. से. टी. संचालक प्रमोद निनावे यांनी सांगितले . वुमेन्स टेलरिंग या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेद अभियानातील , महिला स्वयसहाय्यता समूहातील महिलांनी सहभाग नोंदवला आहे, यासाठी मुरहरी सावंत, डी.एम.एफ यांनी प्रयत्न केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, सुरेश बोचकुरे,यांनी केले, व आभार प्रदर्शन   चांद सय्यद,यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, संतोष काळेगावकर, आसिफ शेख, शाहनवाज पठाण यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS