Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

12 मे जागतिक नर्सिंग डे निमित्त शैक्षणिक क्रीडा सप्ताह सोहळा

शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

बीड प्रतिनिधी - 12 मे रोजी जागतिक नर्सिंग डे निमित्त जिल्हा शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शैक्षणिक क्रीडा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आह

मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी
गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांच्या उजळणी पाढे उपक्रमास प्रतिसाद
जिल्हा बँकेच्या निमित्ताने सहकार मंत्री कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात

बीड प्रतिनिधी – 12 मे रोजी जागतिक नर्सिंग डे निमित्त जिल्हा शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शैक्षणिक क्रीडा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आज सकाळी महाविद्यालयाच्या परिसरात सर्व विद्यार्थ्यांसाठी  प्रार्थमिक स्वरूपात संघर्ष तायक्वांदो  (कराटे )अकॅडमी व पंकजाताई क्रीडा मंडळाच्या वतीने कराटे  प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे, उपप्राचार्य शैलेजा क्षीरसागर  यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
12 मे जागतिक नर्सिंग डे निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात  वेगवेगळे शैक्षणिक क्रीडा उपक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुलींना स्वतःचं संरक्षण करता याव यासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. याचबरोबर निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची, लांब उडी, वेशभूषा स्पर्धा, मेकअप आर्ट्स, चमचा लिंबू, अशा अनेक प्रकारचे मैदानी खेळ यावेळी घेतले जाणार आहेत. या सर्व खेळाच्या प्रकारामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना 12 मे रोजी  योग्य ते बक्षीस दिले जाणार आहेत. आज पासून सुरू झालेल्या या  क्रीडा सप्ताह सोहळ्याचे उद्घाटन  शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. आज सकाळी सहा वाजता सर्व नर्सिंग महाविद्यालयातील  मुला मुलींना संघर्ष तायक्वांदो अकॅडमी व पंकजाताई क्रीडा मंडळ बीड च्या वतीने कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक प्राध्यापका सह विद्यार्थ्यांची मोठी संख्या उपस्थित होती.

COMMENTS