Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीने केला तरुणावर चाकूहल्ला

जळगाव : जळगावमध्ये एका तरुणीने भरदिवसा तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या माजी सैनिकाला कारावास
अखेर तळोदा परिसरातील बिबट्या जेरबंद
सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षकांचा गौरव

जळगाव : जळगावमध्ये एका तरुणीने भरदिवसा तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणीने चाकू हल्ला करत तरुणाला जखमी केले. एका तरुण आणि तरुणीचा भररस्त्यात गोंधळ सुरु होता. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर संतप्त झालेल्या या तरुणीने पर्समधील छोटा चाकू काढला आणि तरुणावर वार करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत या तरुणीने तरुणाच्या छातीवर वार केले. या चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाला.

COMMENTS