पेरू/वृत्तसंस्था ः दक्षिण पेरू देशात एका सोन्याच्या खाणीत भीषण आग लागली असून, या आगीत तब्बल 27 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.अधिकार्यांनी द
पेरू/वृत्तसंस्था ः दक्षिण पेरू देशात एका सोन्याच्या खाणीत भीषण आग लागली असून, या आगीत तब्बल 27 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ला एस्पेरांझा-1 खाणीत एका भुयारात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. दक्षिण पेरूमधील दुर्गम भागात असणार्या या सोन्याच्या खाणीत लागलेली आग देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. पोलिस व सरकारी वकीलांनी आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगितले जात आहे. सरकारी वकील जियोवन्नी माटोस यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, खाणीत 27 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. दरम्यान स्थानिक माध्यमांनी सुरुवातीला सांगितले होते की, खाणीत स्फोट झाल्यानंतर आग भडकली. स्फोटामुळे खाणीतील लाकडांनी पेट घेतला. आग लागली त्यावेळी कामगार 100 मीटर आत जमिनीत होते.
COMMENTS