Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावरान आंब्याची चव महागणार

जळकोट प्रतिनिधी - जळकोट तालुका तसेच परिसरामध्ये गत 20 दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसासोबत वादळी वारे देखील वाहत आहेत. घोणसी परिसरामध्ये तर प्रच

‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?
शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

जळकोट प्रतिनिधी – जळकोट तालुका तसेच परिसरामध्ये गत 20 दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसासोबत वादळी वारे देखील वाहत आहेत. घोणसी परिसरामध्ये तर प्रचंड अशी गारपीट झाली. सततचा पाऊस वादळी वारे आणि गारा यामुळे फळाचा राजा आंब्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या होण-या पावसामुळे शिवारातून गावरान आंबा नाहीसा झाला आहे. यामुळे या उन्हाळ्यात गावरान आंब्याची चव महागणार आहे.
सततच्या पावसामुळे तसेच वादळामुळे गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक ठिकाणी आंब्याचा सडा पाहायला मिळाला. अगोदरच यावर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. अशातच निसर्गाच्या अकृपेमुळे आंब्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. शिवारामध्ये गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे. वातावरणातील बदल तसेच पावसाच्या कमी अधिकपणामुळे गावरान आंबा जवळपास नाहीसा झाला आहे. शिवारामध्ये कुठेतरी गावरान आंबा दिसतो. आणि अशा मध्येच वादळी वारा आणि गारपिटीमुळे गावरान आंब्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. जळकोट परिसरामध्ये ब-यापैकी गावरान आंबा आहे. परंतु परवा झालेल्या वादळी वा-यामुळे आंब्याच्या झाडाखाली जमिनीवर अक्षरश: आंब्याचा सडा पडला होता. यामुळे आंबा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानी सोबतच गावरान आंब्याची चव मात्र महागणार आहे. कंरजी, कोळनूर, जळकोट, केकतशिंदगी, वांजरवाडा, पाखंडेवाडी, दापका, हिंपरगा, नागरजांब, होंडाळा, रावणकोळा, हळद वाढवणा, कुणकी, पाटोदा बु, जंगमवाडी, अतनूर, घोणशी, परिसरातील गावरान आंबा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

COMMENTS