लियोनेल मेस्सीला सौदी अरब क्लब अल हिलालकडून प्रस्ताव मिळाला आहे. दिलेल्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराच्या ज
लियोनेल मेस्सीला सौदी अरब क्लब अल हिलालकडून प्रस्ताव मिळाला आहे. दिलेल्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराच्या जवळच्या सूत्रांनी अशी माहिती दिलीय. अद्याप अल हिलालकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सौदी क्लबकडून मेस्सीला वार्षिक 400 मिलियन डॉलर्सचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर फोर्ब्सने म्हटलं की, अल नस्रचा प्रतिस्पर्धी क्लब असलेल्या अल हिलालने लियोनेल मेस्सीला त्यांच्यासोबत येण्यासाठी वर्षाला 400 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 3 हजार 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. फोर्ब्जने हे वृत्त ट्रान्सफर मार्केट तज्ज्ञ फॅब्रीजिओ रोमानो आणि सौदी गॅजेटच्या हवाल्याने दिलीय. यात म्हटलंय की, लियोनेल मेस्सीने हा प्रस्ताव स्वीकारला तर फोर्ब्जच्या यादीत मेस्सी जगात सर्वाधिक पैसे मिळवणारा फुटबॉलपटू आणि एथलिट बनेल. मेस्सी सौदी अरबच्या टुरिझम ब्रँड एम्बेसडर आहे. तर रोनाल्डोने डिसेंबर 2022 मध्ये सौदीतील क्लब अल नस्रसोबत वर्षाला जवळपास 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. मेस्सी सध्या फ्रान्सच्या पेरिस सेंट जर्मनचा भाग आहे. त्याला क्लबने दोन आठवड्यासाठी निलंबित केलं आहे. परवानगीशिवाय सौदी अरबला गेल्याचा त्याच्यावर आरोप आहे. निलंबन काळात मेस्सीला सराव करण्यासाठीही मंजुरी दिली जाणार नाही.
COMMENTS