Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव नगर परिषदेची कारवाई सुरू

माजलगाव प्रतिनिधी - शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आत्ता नगर परिषदचे परिवेक्षाधीन मुख्याधिकारी  आदित्य जिवने मालमत्ता कर व नळपट्टी थकीत ठेवणार

अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचणे हेच योजनेचे खरे यश ः राज्यपाल बैस
संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात
चिखलठणवाडीला मिळाले हक्काचे डाक कार्यालय

माजलगाव प्रतिनिधी – शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आत्ता नगर परिषदचे परिवेक्षाधीन मुख्याधिकारी  आदित्य जिवने मालमत्ता कर व नळपट्टी थकीत ठेवणार्‍या कडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार आज शहरातील अनेक मालमत्ता सील केल्याची कारवाई नगर परिषदेने केली.
माजलगाव नगर परिषदेचा मालमत्ता व नळपट्टी थकीत आहे. वारंवार मालमत्ता धारकांना थकबाकी भरण्याबाबत नोटीस देऊन ही भरण्यात येत नव्हती. अखेर परिवेक्षाधीन मुख्याधिकारी  आदित्य जिवने यांनी थकबाकी बाबत कठोर पाऊल उचलत वसुली मोहीम राबवली. त्यानुसार आज (दि.3) बुधवारी शहरातील अनेक व्यापारी संकुल व दुकाने सिल केल्याची कारवाई केली. मालमत्ता सील करण्याची कारवाई मोहीमेत कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे, चंद्रकांत बुलबुले, बापू  उजगरे, भगवान कांबळे, शंकर चव्हाण, सखाराम होके व सर्व वसुली कर्मचारी होते. मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा माजलगाव शहरातील ज्या मालमत्ता ची कराचा भरणा बाकी आहे. त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे कराचा भरणा करावा. अन्यथा उद्या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे न. प.कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे यांनी सांगीतले. तसेच अतिक्रमण हटाव मोहीम दुसर्‍या दिवशी चालू होती.

COMMENTS