केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील नांदूरघाट येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज यांच्या पथकाने नांदूरघाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त करून मोठ
केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील नांदूरघाट येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज यांच्या पथकाने नांदूरघाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त करून मोठी कारवाई केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. 2 मे2023 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस जमादार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, अनिल मंदे आणि विकास चोपणे हे अवैध धंद्यावर छापा घालण्यासाठी नांदुरघाट येथे गेले होते. तेथे गुप्त बातमीदार मार्फत पोलीस पथकाला अशी माहिती मिळाली की, नांदूरघाट येथील अजय त्रिमुखे व ओम गोंद्रे हे दोघे विनापरवाना बेकायदेशीररित्या शास्त्राची चोरटी विक्री करीत आहेत. त्या पैकी एकजण मच्छी बाजार येथे येणार आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत कळविली. पंकज कुमावत यांच्या आदेशाने मच्छी बाजारातून अजय त्रिमुखे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून दोन तलवारी ज्याची किमत 6 हजार 500 रु. आहेत त्या जप्त केल्या. पोलीस जमादार बालाजी दराडे यांच्या तक्रारी वरून अजय तुकाराम त्रिमुखे व ओम गोंद्रे दोघे राहणार नांदुरघाट यांचे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS