Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयत्याने वार करणार्‍या दोघांना 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

पुणे/प्रतिनिधी ः  हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जात असताना चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालून गाडीच्या डिक्कीतून कोयते काढून एका तरुणाच्या डोक्

 मानवधन संस्थेची दिशादर्शक जीवनमूल्य देणारी अभिनव संकल्पना – पो. आ. सुधाकर सुरडकर
 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
शिक्षक भरती घोटाळा आणि ऑपरेशन लोटस

पुणे/प्रतिनिधी ः  हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जात असताना चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालून गाडीच्या डिक्कीतून कोयते काढून एका तरुणाच्या डोक्यावर आणि खांद्यावर वार करत खुनाचा प्रयत्न करणार्या दोघा जणाना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
प्रशांत गणेश पासलकर (वय – 28, रा. जगताप आळी, महाराष्ट्र चौक, ता. पुरंदर जि. पुणे) आणि विशाल संजय पवार (32, रा. इंदिरानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला होता. तर दामोदर सर्जेराव जगताप (वय – 57, रा. महाराजा चौक, कोडीत नाका, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर खुनी हल्ला करण्यात होता. या खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले आहे. तक्रारदार दामोदर जगताप हे एसटी महामंडाळात मॅकॅनिक म्हणून नोकरीस होते. 15 डिसेंबर 2015 रोजी त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते पुण्यात कामासाठी येऊन पुन्हा सासवड येथे आले होते. नेहमी प्रमाणे ते घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दत्तात्रय सुभागडे यांच्या स्टो टीन मेकर्स दुकानात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांना लघुशंका आल्यामुळे ते जवळच असलेल्या यशराज हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जात असताना तेथे त्यांचा चुकून धक्का गणेश पासलकर याला लागला होता. त्यामुळे त्याच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी कोयते काढून जगताप यांच्यावर वार केले. जखमी अवस्थेत ते पळत टेरेसवर गेले. तेथे त्यांनी टेरेसचा दरवाजा लावून मुलाला फोन करून प्रकार सांगितला. त्यावेळी मुलगा तात्काळ तेथे आला. त्याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही हवेत कोयते फिरवत निघुन गेले. यावेळी त्यांना नागरिकांनी पाहिले. त्यानंतर त्यांना दवाखाण्यात उपचरासाठी दाखल करण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील सुनिल हांडे यांनी 9 साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय पुरावे आणि फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरली.

COMMENTS