रांची/वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या धमतरी येथे राष्ट्रीय महामार्ग 30 वर बुधवारी रात्री बोलेरो आणि ट्रकची भीषण टक्कर झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्
रांची/वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या धमतरी येथे राष्ट्रीय महामार्ग 30 वर बुधवारी रात्री बोलेरो आणि ट्रकची भीषण टक्कर झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून सुदैवाने एक बालिका सुखरूप बचावली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करत अपघाताबद्दल शोक संवेदना व्यक्त केली.
यासंदर्भातील माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 30 वर बुधवारी रात्री भरधाव ट्रकने बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. धमतरी, कांकेर राष्ट्रीय महामार्गावरील जगत्राजवळ झालेल्या या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोलेरो गाडी कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातातील जखमी बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पुरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार साहू यांनी सांगितले की, बुधवारी 11 जण बोलेरोमधून सोराम-भाटगाव येथून मिरवणुकीत मरकटोला गावात गेले होते. तेथून रात्री घरी परत येत असतांना केशव साहू हे बोलेरा चालवत होते. लग्न साहू कुटुंबातच झाले होते. धमतरी-कांकेर राष्ट्रीय महामार्गावर जगत्रापूर्वी तीन किलोमीटर अंतरावर कांकेरकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि बोलेरा यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकांच्या मदतीने बोलेरो गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या 6 महिन्यांच्या चिमुरडीला उपचारासाठी रायपूरला पाठवले आहे. संजीवनी आणि पोलिसांच्या वाहनाच्या मदतीने सर्वांचे मृतदेह सामुदायिक आरोग्य केंद्र गुरुरच्या करवतीत ठेवण्यात आले आहेत. रात्र असल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी चिमुकली लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली, तर अपघातात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.
COMMENTS