Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांच्या कारखान्याला साडेचार लाखाचा दंड

बारामती अ‍ॅग्रो कारखान्यावर साखर आयुक्तालयाची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने साडे चार लाखांचा दंड ठोठाव

आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण
दुधोडीतील कार्यकर्त्यांचा आ. रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

अहमदनगर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकऱणी भाजप आमदार राम शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाच आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्यात 12 तारखेपासून गळीत हंगाम सुरू केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. एकीकडे राज्याच्या राजकीय गोंधळ सुरू असतांनाच हा दंड ठोठावण्यात आला आहे.  साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख जाहीर केली होती. ही तारीख सर्व कारखान्यांनी पाळणे गरजेचे असतांना रोहित पवार यांच्या बारामती ग्रो कारखान्याने या तारखेआधीच गाळप हंगाम सुरू केला होता. यावरून या पूर्वी रोहित बारामती ग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दंडात्मक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यानुसार पवार यांच्या कारखान्याला 4 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

क्लीनचीट देणार्‍या लेखापरीक्षकांचे केले होते निलंबन – भाजपचे आमदार प्रा. राम शिंदेंनी केलेल्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर अधिकार्‍यांनी चौकशी करून रोहित पवार यांना क्लीनचीट दिली. त्यानंतर त्या अधिकार्‍यांचे नाव अजय देशमुख असून त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर सहकार विभागाकडे प्रा. राम शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता साखर आयुक्तांनी बारामती अ‍ॅग्रोला साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे.

शिंदे विरुद्ध पवार संघर्ष – भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार करत पाठपुरावा केला होता. त्यामुळे बारामती अ‍ॅग्रो कारखान्यावर ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे. तसा पवार विरुद्ध संघर्ष जुनाच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले होते. तेव्हापासून शिंदे विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळतो. आता बारामती अ‍ॅग्रोच्या निमित्ताने शिंदे विरुद्ध पवार असा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

COMMENTS