Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अध्यक्षपदावरून निवृत्त

मुंबई प्रतिनिधी - शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?"महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभ

राहुरी विधानसभा डॉ. सुजय विखे लढणार ?
लाकूड माफिया विरुद्ध धडक कारवाई; ४३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | LokNews24
नवनियुक्त राज्यपालांचे स्वागतकिय ! 

मुंबई प्रतिनिधी – शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?”महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.  “मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली

COMMENTS