Homeताज्या बातम्यादेश

महिलेच्या बॅगेतून निघाले तब्बल २२ साप

चेन्नई प्रतिनिधी - चेन्नई विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे असलेल्या एका प्रवाशी महिलेच्या बॅगमध्ये चक्क साप सापडले आहेत. एक दोन

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपकडून विखे, राजळे, कर्डिले, शिंदे, पाचपुतेंना उमेदवारी
पेटा संघटना बैलगाडा शर्यतीविरोधात घटनापीठाकडे मागणार दाद
नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार

चेन्नई प्रतिनिधी – चेन्नई विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे असलेल्या एका प्रवाशी महिलेच्या बॅगमध्ये चक्क साप सापडले आहेत. एक दोन नाही तर तब्बल २२ साप ही महिला आपल्या बॅगेत घेऊन फिरत होती. विविध जातीच्या सापांसह महिलेच्या बॅगेत एक मोठा सरडा देखी सापडला आहे. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर ही घटना उघडकीस आली असून सदर महिला मलेशियातील क्वालालंपूरहून आली होती. विमानतळावर असेलल्या सुरक्षा रक्षकांनी सामानाची तपासणी करताना या महिलेची चोरी पकडली. बॅग तपासत असताना त्यात एका प्लास्टीकच्या डब्यात साप भरून ठेवले होते.हा डब्बा पारदर्शी असल्याने बॅगेत साप असल्याचे तपासणी करणाऱ्या व्यक्तीच्या पटकन लक्षात आले. . सीमाशुल्क कायदा, 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत सीमाशुल्क विभागाने साप आणि सरडा या प्रण्यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. तसेच महिलेला देखील अटक करण्यात आली आहे.सदर महिलेने असे का केले? हे साप घेऊन ती कोठे चालली होती याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा व्हिडिओ मात्र समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही वन्यजीव संरक्षक महिलेच्या बॅगेतून साप बाहेर काढत आहेत. लागोपाठ एकएक असे तब्बल २२ साप त्यांनी बाहेर काढलेत

COMMENTS