Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळीसह एका स्थानिक टोळीला अटक  

सोलापूर प्रतिनिधी -  दिवसाढवळ्या जिल्ह्यातील बार्शीसह राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळी आणि एका स्थानिक टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथ

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन
अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा बंजारा रंगात रंगला होळी उत्सव

सोलापूर प्रतिनिधी –  दिवसाढवळ्या जिल्ह्यातील बार्शीसह राज्यभरात चोरी करणाऱ्या इंदोर येथील टोळी आणि एका स्थानिक टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोन्ही टोळ्यांकडून नऊशे ग्रॅम सोने, दीड किलो चांदी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका गुन्ह्यात पोलिसांनी पवन उर्फ भुरा रामदास आर्य राहणार इंदौर, मनोजकुमार उर्फ राहुल ठाकुरदास आर्य राहणार मध्य प्रदेश, दीपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोड, देवेंद्र उर्फ रामलाला गुर्जर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ७५२ ग्रॅम सोने, १,५७९ ग्रॅम वजनाचे चांदीची ३ ताटे, रोख चार लाख रुपये व कार असा एकूण ५४ लाख ५४ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून एकून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात जिल्ह्यात ५ घरफोड्या केल्याप्रकरणी अनिल श्रीमंत पवार राहणार अक्कलकोट यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एकूण आरोपींनी १३ घरफोड्या, एक दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.

COMMENTS