Homeताज्या बातम्यादेश

जयराम रमेश विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार

नवी दिल्ली : राज्यसभेतील काँग्रेसचे व्हीप जयराम रमेश यांनी अध्यक्षांवर केलेल्या टिप्पणीसंदर्भात भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी तक्रार केलीय.

भातकुडगाव फाटा कडकडीत बंद
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे प्रयोगशील शिक्षण ः डॉ. पराग काळकर
डॉ.ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर घ्यावे-शिवसंग्रामची मागणी

नवी दिल्ली : राज्यसभेतील काँग्रेसचे व्हीप जयराम रमेश यांनी अध्यक्षांवर केलेल्या टिप्पणीसंदर्भात भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी तक्रार केलीय. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही तक्रार विशेषाधिकार समितीकडे वर्ग केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले होते की, स्पीकरने सत्ताधारी पक्षाचे ’चीअरलीडर’ नसावे आणि विरोधकांचेही ऐकले पाहिजे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारंवार व्यत्यय आला आणि अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीच्या मागणीवरून विरोधकांच्या गदारोळानंतर कोणतेही महत्त्वपूर्ण व्यवहार होऊ शकले नव्हते. डॉ. सुधांशू त्रिवेदींनी केलेल्या तक्रारीवर राज्यसभा सचिवालयाने जयराम रमेश यांच्या विधानाची खातरजमा केली. त्यानंतर याप्रकरणी रमेश यांनी राज्यसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या विधानामुळे विशेषाधिकार हनन होते की नाही हे तापासून पाहण्यासाठी राज्यसभा कामकाजाचे नियम 203 अंतर्गत विशेषाधिकार समितीकडे वर्ग केली आहे. जयराम रमेश यांच्या विरोधातील तक्रारी सोबतच  भाजपच्या आणखी एका सदस्यानेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध अशाच कारणावरून अवमाननेची केल्याची तक्रार दाखल केली आहे, परंतु सभापतींनी त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

COMMENTS