जळगाव प्रतिनिधी - चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. चोपडा तालुक्यात दहा मतदानकेंद्रांची व्यवस्था
जळगाव प्रतिनिधी – चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. चोपडा तालुक्यात दहा मतदानकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. चोपडा येथील कस्तुरबा विद्यालयात चार मतदान केंद्र, धानोरा येथे दोन मतदान केंद्र, वैजापूर येथे दोन मतदान केंद्र, घोडगाव दोन येथे मतदान केंद्र आहेत. या दहा मतदान केंद्रांवर मतदार मतदान करण्यासाठी येत आहे. त्याचबरोबर उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्याला कसं मतदान होईल यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन पॅनल चे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे, त्यासाठी 2027 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पॅनलने कार्यकर्त्यांसाठी पेंडॉल टाकले आहे. या पेंडॉलमधून मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. या पेंडॉल जवळ कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे .
COMMENTS