Homeताज्या बातम्यादेश

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले

नवी दिल्ली : केदारनाथ पाठोपाठ आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. मंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलं होतं.

काश्मीरमध्ये कर्नलसह 3 जवानांना वीरमरण
आरोग्य यंत्रणेची कसोटी
मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात

नवी दिल्ली : केदारनाथ पाठोपाठ आता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. मंदिराला 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलं होतं. बद्रिनाथचे दरवाजे उघडल्यानंतर खर्‍या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक बद्रिनाथ धाममध्ये उपस्थित होते.
लष्कराने बँडची धून वाजवली तर भाविकांनी दिलेल्या जय बद्री विशालच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरवाजे उघडण्यापूर्वीच पहिले शंकराचार्य अविमुक्तेश्‍वानंद मंदिरात पोहोचले होते. चारधाम यात्रेपैकी एक आणि महत्त्वाचे मानल्या जाणार्‍या बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे पारंपरिक रितीरिवाजानुसार खुले करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मंदिरातील पहिली पूजा करण्यात आली. मंदिराचे दरवाजे खुली करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण मंदिरावर झेंडूच्या फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली होती. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. बद्रिनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम आहे. बद्रिनाथमध्ये भगवान विष्णूंचा वास आहे. बारा महिने येथे भगवान विष्णूचा वास असतो. बद्रिनाथमध्ये भगवान विष्णू सहा महिने आराम करतात तर सहा महिने भक्तांना दर्शन देतात. पुढील सहा महिने सर्व देवता भगवान विष्णूची पूजा करतात. यामध्ये देवर्षी नारद हे प्रमुख पुजारी असतात.

COMMENTS