Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा( पॅथॉलॉजिकल लॅब्स) च्या तपासण्या करून अहवाल सादर करा–जिल्हाधिकारी

बीड प्रतिनिधी - खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा( पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नाही, तस

रुग्णांच्या सेवा-सुश्रुषेसाठी धावून आले ’नर्सिंग’चे प्रशिक्षित विद्यार्थी !
अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण | LokNews24
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

बीड प्रतिनिधी – खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा( पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नाही, तसेच प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा काही पॅथॉलॉजिकल लॅब्स मध्ये उपस्थित नसल्याचे नमूद करण्यात आल्याने बीड येथील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नियमानुसार तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी दिले.
यावेळी बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्यास सादर केला जावा. जिल्हास्तरीय समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यानंतर घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी केले. बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली या प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे बोलत होत्या. बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (गृह) पी एन शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  , जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालयाचे डॉ पी के पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे विधी सल्लागार अ‍ॅड. जोशी, अशासकीय सदस्य आर टी गर्जे, शेख सिराज हे उपस्थित होते. बोकस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांचे सह तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी तसेच तहसील व पोलीस विभागाचे प्रतिनिधी आहेत. बोगस डॉक्टर बाबतच्या 62 केसेस जिल्ह्यात दाखल असून यापैकी 32 न्यायप्रविष्ठ आहेत. सन 2019-20 या वर्षात तीन प्रकरणे दाखल झाली.  होती 20 -21 या वर्षात एक व 21-22 या वर्षात दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS