Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनार्दन स्वामींवरील दीर्घकाव्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण

कोपरगाव प्रतिनिधी ः राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नावाची दैवी शक्ती संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. अध्यात्म कसं असावं? त्याचे ज्वलंत उदाहरण म्ह

काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
वीरभद्र ट्रस्टच्या अध्यक्षपदी निधाने तर, उपाध्यक्षपदी बोठे

कोपरगाव प्रतिनिधी ः राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नावाची दैवी शक्ती संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. अध्यात्म कसं असावं? त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सदगुरु जनार्दन स्वामी महाराज त्यांच्या जीवानचरीञावर लिहीलेल्या  सत्यम शिवम सुंदरम या काव्यमय जीवनकथा पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रामेशगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील मीना संदिप शिंदे या बाबाजींच्या भक्त परिवारात एक निस्सीम भक्त असून त्यांची बाबाजींवर मनापासून नितांत श्रद्धा आहे. त्या श्रध्देतून मीना संदिप शिंदे यांनी ’सत्यम शिवम सुंदरम्’ नावाचे दीर्घकाव्य लिहिले असून त्यामध्ये सदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यमय जीवनकथा त्यांनी लिहिण्यासाठी सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत त्याच्या दोन हजार आठशे ओळी पूर्ण झाल्या आहे मुखपृष्ठाच्या अनावरण प्रसंगी रमेशगिरी महाराज यांनी मीना संदिप शिंदे यांचा सत्कार करीत त्यांनी बाबाजींच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या दीर्घकाव्या बाबत त्यांना शुभेच्छा देत बाबाजींची पारायण प्रत आपण लिहावी अशी इच्छाही यावेळी व्यक्त केली. तर या प्रसंगी लेखिका मीना शिंदे  यांनी आपल्या ’सत्यम शिवम सुंदरम’ नावाचे दीर्घकाव्या बाबत माहिती देत आपणास हे काव्य लिहिण्यासाठी स्फूर्ती कशी मिळाली ते सांगत एका महिलेला हे लिहिण्यासाठी परवानगी मिळाली त्याबाबद्दल त्यांनी बाबाजींचे ऋण व्यक्त केले. या पुस्तकाचा लिखाण प्रवास अजून चालू आहे. तो पूर्णत्वाला नेऊन लवकरच सर्व वाचक प्रेमींच्या आणि बाबाजींच्या भक्त परिवारासाठी त्याची प्रत उपलब्ध होईल असे ही त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र बिडवे, मिनींनाथ तिपायले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

COMMENTS