Homeताज्या बातम्याविदेश

प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन

पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फतेह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांची मुलगी नताशा फतेहने ट्विट करून ही माहिती द

प्रा. सोनाली हरदास-जेजुरकर यांना पीएच.डी. प्रदान
आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे
मनपाच्या संभाव्य घरपट्टी वाढीविरोधात ; शहर काँग्रेस एल्गार पुकारण्याच्या तयारीत

पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फतेह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांची मुलगी नताशा फतेहने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे तारिक फतेह हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तारिक यांचे निधन निश्चितच झाले आहे, पण यापुढेही त्यांची क्रांती सुरूच राहील, असे नताशाने म्हटले आहे. या क्रांतीमध्ये सर्व समर्थकांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. “पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्याचा वक्ता, न्यायासाठी लढणारा, दलित आणि अत्याचारितांचा आवाज, तारिक फतेह यांचे निधन झाले आहे. त्यांना ओळखणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी त्यांची क्रांती सुरूच राहील.”

COMMENTS