लोहा प्रतिनिधी - शहरातील सकल ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशूराम जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील देऊ
लोहा प्रतिनिधी – शहरातील सकल ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशूराम जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील देऊळगल्ली भागातील परशूराम मंदिरात सकाळी श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिषेक करून रथातून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक विठ्ठलवाडी येथील मशीद समोर येताच मुस्लिम बांधवांनी परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तर ब्राम्हण समाज बांधवांनी मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकाच दिवशी अनेक सन उत्सव आल्यामुळे शहरातील सर्वत्रच आनंदाचे वातावरण दिसून येत होते.
शहरातून भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त देऊलगल्ली येथील भगवान परशुराम यांच्या मूर्तीचा अभिषेक सेवानिवृत्त नायब तहसीलदार अशोक शेवडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रथातून भगवान परशुराम यांच्या तैलचित्राची मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदरील मिरवणुकीत ढोल ताशा तसेच टाळमृदंगाच्या गजरात परशुराम यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या. परशुराम यांची जयंती मिरवणूक परशुराम मंदीर ते भाजी मंडई पर्यंत काढण्यात आली. दरम्यान लोहा शहरातील मिरवणूक मार्गावरील जामा मशीद समोर येताच मुस्लिम बांधवांनी परशुराम जयंती निमित्त तर जयांतीतील सहभागी ब्राम्हण बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या आलिंगन देवून शुभेच्छा दिल्या. तसेच ठिकठिकाणी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यामध्ये नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी नगराध्यक्ष किरण वाटमवार, नगरसेवक केशवराव मुकदम आदींसह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर परशुराम मंदिरात महाआरती व प्रसाद वाटप ने मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी ब्राह्मण महासंघ अध्यक्ष संजय मक्तेदार, उपाध्यक्ष विजयकुमार तोताडे, कोषाध्यक्ष सुदिपराव पेनूरकर, सचिव राजेश्वर पाथरकर, सहसचिव दिपक भातलवंडे, प्रशांत मक्तेदार, खंडू गुरू जोशी,मुदगल गुरू धाबे, जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.लक्ष्मीकांत महाराज, प्रभाकरराव कुलकर्णी, दिपकराव लव्हेकर, प्रभाकरराव दतोपंत कीटे, मा. ना. कुलकर्णी, सुर्यकांत सनपुरकर, जगदीश पेनूरकर, मदन गुरू खोडवे, बाळू गुरू खोडवे उपस्थित होते. शोभायात्रा नियोजन समितीचे मारोती जोशी, गिरीश पेनूरकर, गजानन बेरळीकर, सुधाकर बेरळीकर, सुनील गुरू कुलकर्णी, विलास तोताडे, शूभम जोशी, हर्ष धाबे व सकल ब्राह्मण युवक मंडळांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्यात ब्राह्मण महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS