Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवणी परिसरात चिंंचेतून मिळते रोजगार संधी

देवणी प्रतिनिधी - देवणी तालुक्यात उन्हाळ्यात शेती कामासह अन्य कुठले काम नसल्याने महिला व ठराविक पुरुष घरीच असतात. मग अशाच दिवसात हंगामी उद्योग म्

लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा
ग्रंथ वाचनामुळे बौद्धिक समृद्धी वाढते
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

देवणी प्रतिनिधी – देवणी तालुक्यात उन्हाळ्यात शेती कामासह अन्य कुठले काम नसल्याने महिला व ठराविक पुरुष घरीच असतात. मग अशाच दिवसात हंगामी उद्योग म्हणूनचिंंचाकडे पाहिले जाते. एक महिन्यापासूनचिंंचाचे काम सुरूअसून त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. देवणी तालुक्यातील अनेकांना चिंचेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
देवणी तालुक्यातील परिसरात गेल्या एक महिन्यापासूनचिंंचा झोडणे ,गोळा करणे ,फोडने नंतर बाजारात आणून विकणे या छोट्या व्यवसायाला गावोगावी प्रतिसाद मिळत आहे. उन्हाच्या कालावधीत घरी बसूनचिंंचा फोडण्याचे काम महिला करीत आहेत. चिंचा फोडण्याच्या कामात एका कुटुंबातील चार-पाच जण मिळून 50 किलोच्या जवळपासचिंंचा फोडून, सोलून , चिंचुके बाजूला गोळा करण्याचे काम केले जात आहे.चिंचा फोडून देण्यासाठी व्यापारी प्रति किलो 15 रुपये दराने पैसे देतात. दिवसात एक महिला किमान 20 किलोच्या आसपासच्या फोडण्याचे काम करते. जर कुटुंबातील चार-पाच जण मिळून काम केले तर आरामशीर पन्नास किलोकिंवा त्यावरचिंच फोडली जात आहे. त्यामुळे त्यांना 300 रुपयांपासून ते 500 रुपये पर्यंत दिवसाला रोजगार पडत आहे. काही जण झाडावरीलचिंंच झोडपण्याचे काम करताना त्यांना 700 ते 800 रुपये हजेरी दिली जाते तर झाडाखालीलचिंच गोळा करण्यासाठी एक महिलेला 250 ते 300 रुपयांची हजेरी मिळत आहे. एकाचिंचेच्या झाडालाचिंंचा काढण्यासाठी कुठे तीन तर कुठे पाच माणसे काम करतात. या परिसरात अनेक जणचिंचाचा व्यवसाय करतात. मात्र गेल्यावर्षी पूर्वी भावचिंंचाला दहा ते बारा हजार रुपयां पर्यंत होता मात्र यावर्षी मनावर तसा भाव नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.चिंचा झाडावरून खाली काढण्यासाठी गोळा करण्यासाठी वचिंच फोडून फुल बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यावर्षीचिंचाला भाव जवळपास 5500 ते 6500 रुपये इतका आहे.

COMMENTS