Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक येथे नवीन शासकीय महाविद्यालयासाठी मौजे म्हसरुळ येथील जमीन हस्तांतरणास शासनाची मंजूरी : मंत्री दादाजी भुसे

मुंबई प्रतिनिधी -:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३०

विशेष स्वच्छता मोहीमेंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय – आशिष शेलार
तब्बल 28 वर्षानी माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा

मुंबई प्रतिनिधी -:  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे म्हसरुळ ता.जि. नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. २५७ क्षेत्र १४.०० हे. आर. जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याबाबत शासन ज्ञापन दि. २० एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापिठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी दि. ०५ एप्रिल २०२१ रोजीच्या शासनाने मान्यता दिली होती. तसेच पदवी अभ्यासक्रमा साठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी “महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन,  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयास व रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिकवासीयांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

लवकरच नवीन शासकीय महाविद्यालयाचे भुमीपुजन होणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली. 

COMMENTS