अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे समर्थकांमध्ये ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गुरुवारी दुपार
अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे समर्थकांमध्ये ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीचा दिवस होता ,अखेर 18 जागांसाठी जवळपास 40 हून अधिक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे. यावेळी थोरात आणि विखे समर्थकांनी एकमेकांना शहकट शह देत सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदारसंघातून आपले समर्थक उभे केले आहेत. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, बाजार समितीचे माजी चेअरमन शंकरराव खेमनर आणि विखे समर्थक तत्कालीन बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन सतीश कानवडे हे पॅनलचे नेतृत्व करत असले तरी थोरात विरुद्ध विखे असाच संघर्ष बाजार समिती निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे यांचा मतदारसंघ असलेल्या राहता तालुक्यात महाविकास आघाडीचा पॅनल उभा केला, त्यानंतर विखे यांनीही संगमनेर मध्ये येत आपल्या समर्थकांची जुळवाजुळव करत थोरात यांना शह देण्यासाठी पॅनल उभा केला आहे. वास्तविक पाहता दोन्ही आजी-माजी मंत्र्यांचे स्वतःच्या तालुक्यावर वर्चस्व असल्याने फारसं काही या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल असा तूर्तास तरी अंदाज दिसत नाही. वास्तविक पाहता थोरात विरुद्ध विखे वादात ही पहिलीच मोठी बाजार समितीची निवडणूक होत आहे. याचा परिणाम आगामी नगरपालिका निवडणुकींवरही होणार असल्याचे दिसून येते. संगमनेर मध्ये शिवसेनेनेही तीन उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडीमध्येच आम्ही सामील आहोत असं सांगितले. मात्र थोरात विखे समर्थकांनी माध्यमांसमोर बोलण्यात तूर्तास तरी नकार दिला असला तरी त्यांचे पक्ष नेतृत्वच पुढील भूमिका स्पष्ट करतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
COMMENTS