Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवार-अदानींमध्ये बंद दाराआड चर्चा

दोन तासांच्या चर्चेमुळे तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई/प्रतिनिधी ः हिंडेनबर्ग अहवालानंतर काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या संपत्तीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरल्यानंत

राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री पवार
काही आमदार खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे- बच्चू कडू
पोलिसांनी जप्त केली 49 शस्त्रे आणि पकडले 130 जणांना ; मागील दहा महिन्यांची कामगिरी, 55 गुन्हेही दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः हिंडेनबर्ग अहवालानंतर काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या संपत्तीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरल्यानंतर संसदीय समिती अर्थात जेपीसीकडून अदानी प्रकरणी चौकशी करण्याची मागणीचा जोर लावून धरलेला असतांनाच, गुरूवारी गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा झाल्यामुळे नेमकी काय चर्चा झाली यावर तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट झाली. पवार व अदानी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, राजकीय व उद्योग वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अदानी समूहावर चौफेर हल्ले होत असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार त्यांच्या मदतीला धावले होते. अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नाही. त्याऐवजी न्यायालयीन चौकशी करावी. एखाद्या विदेशी संस्थेच्या आरोपांच्या आधारे आपण आपल्या उद्योगपतीला लक्ष्य करू नये, असं पवार म्हणाले होते. त्यावरून सोशल मीडियात शरद पवारांवर जोरदार टीका झाली होती. शरद पवार हे अदानींना पाठिशी घालून या मुद्द्यावर अडचणीत आलेल्या मोदी सरकारला मदत करत असल्याचा आरोप झाला होता. काँग्रेसच्या काही नेत्यांनी उघडपणे यावर भाष्य केले होते. शरद पवार यांनी अदानींच्या मालकीच्या टीव्हीला मुलाखत देऊनच हे भाष्य का केले, असाही प्रश्‍न उपस्थित झाला होता. राजकीय वर्तुळातून झालेल्या टीकेनंतर शरद पवार यांनी घूमजाव करत अदानी यांच्या जेपीसी चौकशीला आपला विरोध नसल्याचे म्हटले होते. जेपीसी चौकशीपेक्षा न्यायालयीन चौकशी अधिक प्रभावी ठरेल, एवढेच मला म्हणायचे आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असतानाच आता अदानी व पवार भेट झाल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

भेटीचा वेगळा अर्थ काढू नका : चंद्रशेखर बावनकुळे- अनेक वर्षांपासून अदानी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे भेटीगाठी होऊ शकतात. पण या बैठकीचा अर्थ वेगळा लावणे योग्य नाही, असे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, गौतम अदानी आणि शरद पवार हे चांगले मित्र आहे. राजकारणात एक व्यावसायिक चांगले मित्र राहणे अयोग्य नाही. बावनकुळे आहेत, शरद पवार यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहे, त्यामुळे ते अदानी यांना भेटले असतील, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे.

COMMENTS