आयपीएलच्या 2023 प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही वाद हमखास होतात, तर कधी मॅच फिक्सिंगची प्रकरण समोर येतात. सलग पाच सामन्यात पराभवामुळे आधीच संकटात
आयपीएलच्या 2023 प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही वाद हमखास होतात, तर कधी मॅच फिक्सिंगची प्रकरण समोर येतात. सलग पाच सामन्यात पराभवामुळे आधीच संकटात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आहे. यामध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरलाही फटका बसला असून त्याच्यासह इतर खेळाडूंचं सामानंही चोरीला गेलं आहे. दिल्ली संघातील खेळाडूंच्या एकूण 16 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. त्याशिवाय खेळाडूंकडील अन्य सामानही चोरट्यांनी लंपास केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढत्याच या चोरीमुळे सगळ्यात जास्त नुकसान यश ढुलचं झालं असून त्याच्या पाच बॅट्स चोरीला गेल्या आहेत. मिचेल मार्शच्या दोन बॅट्स चोरी झाल्या आहेत. तर फिल सॉल्ट याच्याही तीन बॅट्स गायब आहेत. त्याखेरीज ग्लव्ह्ज, बूट आणि अन्य सामानही चोरीला गेलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू बेंगळुरूहून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना सामान चोरीला गेलं असल्याचं समजलं. पुढील सामन्यात अडचण दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आजच्या सामन्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. खेळाडूंनी आपल्या खोलीचा ताबा घेतला. काही वेळानं त्यांचं सामान रूमवर पोहोचवण्यात आलं तेव्हा सामानातील अनेक गोष्टी गायब असल्याचं खेळाडूंना आढळलं. या चोरीमुळे खेळाडूंना धक्का बसला आहे. यश आणि फिल यांच्या रेडी टू प्ले बॅट्स गायब असल्याने त्यांना आता पुढील सामन्यात अडचण होऊ शकते.
COMMENTS