Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीसंत महिपती महाराजांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत श्री संत कवी महिपती महाराजांचा 57 वा फिरत

खोदकामात सापडला 1098 कॅरेट मोठा हिरा LokNews24
अतिक्रमणात धोंडेवाडी अर्धे गाव उध्वस्त
नागरी प्रश्‍न सोडविण्यात महापालिकेला अपयश का ?

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत श्री संत कवी महिपती महाराजांचा 57 वा फिरता अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. टाळ- मृदुंगाचा गजर आणि जय जय महिपती, नमो महिपतीच्या नामघोषाने प्रतिपंढरी धन्य झाली.
         संत महिपतींच्या पदस्पर्शाने अभिमंत्रित झालेल्या व हिरवाईने नटलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबादच्या माळरानावर जमलेली भाविकांची मांदियाळी, अखंडपणे सुरू असलेला हरिनामाचा आणि टाळ-मृदुंगाचा गजर, वार्‍यांच्या लहरीबरोबर डोलणार्‍या भगव्या पताका, भक्तीविजय ग्रंथाचे पारायण,संपूर्ण राहुरी तालुका परिक्रमा व संत महिपती पादुका- रथ दर्शन सोहळा, परिक्रमावाशीयांचे भाविकांनी उस्फूर्तपणे केलेले स्वागत तद्नंतर मंत्रमुग्ध वातावरणात काल्याच्या कीर्तनात तल्लीन झालेले भाविक आणि दहीहंडी फोडल्यानंतर प्रसाद घेऊन तृप्त झालेला वैष्णवांचा मेळा, या पार्श्‍वभूमीवर संत महिपतींचा 57 व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला. चैत्र महिन्याच्या रखरखीत उन्हात- श्रवणभक्तीत आकंठ बुडालेले भाविंक भक्तीरसात न्हाऊन निघाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे हा सोहळा संपन्न झाला. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या ह्या सोहळ्याची सांगता मोठ्या हर्षउल्हासात झाली. प्रथमच राहुरी तालुक्याची परिक्रमा करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात संत महिपती हस्तलिखित भक्तीविजय ग्रंथाच्या पारायणाचा स्वर दुमदुमला!तालुक्यातील प्रत्येक गावात भाविकांनी महिपतींच्या पादुका-रथाचे भव्य स्वागत केले. महिपतींच्या रथ प्रस्थान पासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत पर्जन्यराजानेही हजेरी लावली. ऊन- वारा -पाऊस यामध्येच भाविकांची परिक्रमा झाली. देवस्थानच्यावतीने व ग्रामस्थांच्यावतीने परिक्रमावाशीयांचे भव्य स्वागत करण्यात आले.  महिपतींनी राज्य व राज्याबाहेरील 284 संतांची चरित्रे लिहिली आहे. हे अनंत उपकार महाराजांनी केलेले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, अशी अपेक्षा कांबळे महाराजांनी व्यक्त केली. कांबळे महाराजांनी काल्याच्या किर्तनप्रसंगी, भगवंताच्या विविध लीला सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. काल्याच्या  कीर्तनानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, लोकनियुक्त सरपंच निवृत्ती घनदाट,  ताहाराबाद सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, नाना महाराज गागरे, अण्णा महाराज गागरे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त बाबासाहेब महाराज वाळुंज, बाळासाहेब मुसमाडे, सुभाष पाटील, अशोक किनकर, बापूसाहेब गागरे, कांता पाटील कदम राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्‍वर माने, माजी सरपंच नारायण झावरे, बाळासाहेब हारदे,विश्‍वनाथ किनकर, विजूअण्णा झावरे, वेणूनाथ औटी,देवस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे,ग्रामस्थ व भाविंक आदीं उपस्थित होते.

COMMENTS