मुंबई/प्रतिनिधी ः भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या हवामान संस्थेने एल निनोचा प्रभाव यंदा राहणार असल्याचे सांगत केवळ 96 आणि 94 टक्के पावसाचा अं
मुंबई/प्रतिनिधी ः भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या हवामान संस्थेने एल निनोचा प्रभाव यंदा राहणार असल्याचे सांगत केवळ 96 आणि 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यापाश्वर्र्भूमीवर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दुष्काळाच्या सावटावर चर्चा करण्यात आली.
यंदाच्या मान्सूनबाबत विविध संस्थांच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकार्यांनी तातडीने बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नद्याचे गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकर्यांवर एकामागोमाग संकटे सुरु आहेत. दुष्काळ जर पडला तर काय काय उपाययोजना करायच्या यावर राज्य सरकार गंभीर असल्याचे दिसून येत आहे. यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पावसाची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी 96 टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे चांगला पाऊस झाला होता. पण यावर्षी एल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण- राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचार्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचार्यांना गट – ड ते गट – अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल. दिव्यांग कर्मचार्यांना गट ड मधून गट ड मधील, गट ड मधून गट क मधील, गट क मधून गट क मधील, गट क मधून गट ब मधील, गट ब मधून गट ब मधील तसेच गट ब मधून गट अ मधील निन्मस्तरापर्यंत चार टक्के आरक्षण देण्यात येईल. रिक्त पद असल्यास चार टक्के पदे दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील.
COMMENTS