नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतात लोकसंख्या वाढीचा वेग मोठा असून, नुकत्याच संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या आकडेवारीनुसार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतात लोकसंख्या वाढीचा वेग मोठा असून, नुकत्याच संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या आकडेवारीनुसार भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल असल्याचे दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 29 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 142 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या भारताची लोकसंख्या चीनच्या तुलनेत 2.9 दशलक्ष अधिक आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार जगाची लोकसंख्या आता 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. तर, भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 42 कोटी 86 लाख आहे, तर चीनची लोकसंख्या आता 1.42 कोटी 57 लाख आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 29 लाखांचा फरक आहे. 1950 पासून, संयुक्त राष्ट्र लोकसंख्येची आकडेवारी ठेवते. ही पहिलीच वेळ आहे की भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडचे मीडिया सल्लागार अता जेफरीज म्हणाले, भारताने चीनला कधी मागे टाकले हे स्पष्ट नाही. दोन्ही देशांच्या लोकसंखेच्या डेटा संकलनात तफावत असल्याने दोन्ही देशांची थेट तुलना करणे कठीण आहे, असे देखील संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
देशात 10 ते 24 वयोगटातील 26 टक्के लोकसंख्या- संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील 25 टक्के लोकसंख्या ही 0 ते 14 या वयोगटातील आहे. तर 10 ते 19 वयोगटातील काही आहेत. चीनचे नागरिक भारतीयांपेक्षा जास्त काळ जगतात. त्यात महिला या पुढे आहेत. त्याच वेळी, 10 ते 24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्क्यांच्या जवळपास आहे. देशातील 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील आहे आणि 7 टक्के लोकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, चीनमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची लोकसंख्या 14 टक्के आहे. चीनमधील लोकांचे आयुर्मान भारताच्या तुलनेत चांगले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये महिलांचे आयुर्मान 82 वर्षे आणि पुरुषांचे 76 वर्षे आहे. याशिवाय भारतातील महिलांचे सरासरी वय 74 वर्षे आहे, तर पुरुषांचे वय केवळ 71 वर्षे आहे.
COMMENTS