Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखे महाराष्ट्रात परत येणार!

छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे लवकरच परत मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्

पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्महत्या | LOK News 24
अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे लवकरच परत मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी सकारात्म प्रतिसाद दिला असून, शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषकेच्या ३५०व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ही तलवार आणि वाघनखे राज्य सरकारच्या ताब्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या संदर्भात गॅम्मेल यांच्यासोबत शनिवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. यावेळी ब्रिटिश उच्चायुक्तालयातील राजकीय विभाग विषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन, महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्य पुरातत्त्व संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याबाबत मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे. या बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रिया ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS