Homeताज्या बातम्यादेश

नंदिनी गुप्ता ठरली मिस इंडिया

फेमिना मिस इंडिया' स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल मणिपूर येथे संपन्न झाला आणि भारताला 'मिस इंडिया २०२३' मिळाली. राजस्थानातील कोटा येथून आलेली १९ वर्ष

मरगळवाडीचे पोपट शिंगाडे यांचा ’भारत गौरव’ पुरस्काराने सन्मान
उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाने बालरोग तज्‍ज्ञांच्‍या ‘नाशिकॉन २०२३’ परिषदेचा समारोप
Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)

फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल मणिपूर येथे संपन्न झाला आणि भारताला ‘मिस इंडिया २०२३’ मिळाली. राजस्थानातील कोटा येथून आलेली १९ वर्षीय नंदिनी गुप्ता हिने ‘मिस इंडिया २०२३’चा खिताब पटकावला.दुसरा क्रमांक पटकावला दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने आणि मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंग हिचा तिसरा क्रमांक आला. २०२३ चा मिस इंडिया खिताब पटकावणारी नंदिनी ही विद्यार्थीही आहे आणि मॉडेलही. बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये तिने पदवी मिळवली आहे.या दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात याआधी मिस इंडियाच्या विजेत्या ठरलेल्या सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मानसा वाराणसी, मान्या सिंग, सुमन राव, शिवानी जाधव यांच्या सादरीकरणाने झाली. तरी या स्पर्धेच्या फिनालेमध्ये फॅशन आणि मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अनेक मंडळी ही उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी देखील परफॉर्म केलं.स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केलं. तर या कार्यक्रमात मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी त्यांच्या बोलण्याने रंगत आणली.

COMMENTS