Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किडनीविकार होऊ नये यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवणे गरजेचे : डॉ. पार्थ देवगावकर

50 दाम्पत्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जड

एम‌आय‌एम चे प्रश्न योग्य ; टायमिंग चूक!
भाजपशी युती हाच शेवटचा पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
महापुरूषांनी स्वसामर्थ्यावर शाळा सुरू केल्या !

नाशिक : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. मूत्रपिंड विकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. या सर्वांत महत्वाचे लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबेटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो. यावर तातडीने उपचार केले नाही तर, मूत्रपिंडाचे काम पूर्ण थांबू शकते. मूत्रपिंडावर झालेला परिणाम हा तात्पुरता असल्यास त्यावर तातडीने उपचार करून त्याचे कार्य पूर्ववत करणे शक्य असते. मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्या. स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. फास्ट फूड टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. रक्तदाब-डायबेटीस असल्यास अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन किडनीविकार तज्ञ डॉ. पार्थ देवगावकर यांनी केले.

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आयोजित विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या 50 दाम्पत्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. पार्थ देवगावकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमोल पाटील, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील, रंजनभाई शाह, रमेश डहाळे, देवराम सैंदाणे, जितेंद्र येवले, भा.रा.सुर्यवंशी उपस्थित होते. सुरुवातीला लोकज्योती मंचच्या उपक्रमाची माहिती सचिव रमेश डहाळे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी व्यासपीठावर प्रातिनिधीक बाळकृष्ण व पुष्पा दंडगांवकर, श्रीकृष्ण व सिंधु ददगाळ, दामोदर व माधुरी वारके, गणेश व शकुंतला राखोंडे, दत्तात्रय व गितांजली गोसावी, खंडेराव व जिजाबाई बिन्नोर या दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

घटस्फोटांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोठ्या पगारांवर नोकरी करणारे दाम्पत्य अवघ्या दोन ते तीन वर्षांमध्ये घटस्फोट घेत आहेत. त्यामुळे घटस्फोट रोखण्यासाठी ज्येष्ठ दाम्पत्यांनी नवोदित दाम्पत्यांना वैवाहिक जीवनातील अनुभव सांगत मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन सुरेश पोतदार यांनी सत्कारास उत्तर देतांना केले. तसेच लोकज्योती मंचच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

नाशिक शहरातील 50 दाम्पत्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, महावस्त्र, भेटवस्तू, बटवा व टोपी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल पाटील यांनी ज्येष्ठांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले. मुख्याध्यापक कैलास पाटील, डी.के.गोसावी यांनी ज्येष्ठांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे आपल्या मनागतातून कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र मालुंजकर यांनी केले तर आभार भा.रा.सुर्यवंशी यांनी मानले.

COMMENTS