Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितांना सत्तेत आणण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न

निलंगा प्रतिनिधी - घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340 घटनेत समावीष्ट करून ओबीसी व वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिल

तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात
मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच

निलंगा प्रतिनिधी – घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340 घटनेत समावीष्ट करून ओबीसी व वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिलांना हिंदू कोड बिल लागू करून संरक्षण दिले. ख-या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच वंचित घटकांना न्याय दिला. आणि आता अ‍ॅड बाळासाहेब आंबेडकर वंचितांना सत्तेवर बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसारच जयंती पक्षाच्या वतीने बौद्ध वसाहतीच्या बाहेर निळा ध्वज फडकविण्यात आला. अन तो कायम फडकत राहील असे मत वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुताई निंबाळकर यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निंबाळकर वसाहत येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड जगदिश सूर्यवंशी, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, रजनीकांत कांबळे, सलिम सय्यद, हमीद शेख, डॉ हिरालाल निंबाळकर हे उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ओबीसी व वंचित समाजासाठी ज्या घटनेत तरतूदी आहेत त्या प्रस्थापितांनी आतापर्यंत भेटूच दिल्या नाहीत. म्हणूनच अ‍ॅड बाळासाहेब आंबेडकर महिलांना व वंचित समूहांना सत्तेत बसविण्यासाठी अहोरात्र मेहनत व कष्ट घेत आहेत. प्रस्थापित नेत्यांना आपल्या वस्तीवर बोलाऊन त्यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात येणारी जयंती साजरी न करता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंती पक्षाच्या वतीने साजरी करण्यात यावी असे आदेश देण्यात दिले. त्याची अंमलबजावणी निलंगा तालुक्यातील महिला आघाडी तर्फे उत्साहात साजरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी क्रांतीचे प्रतिक असलेला निळा ध्वज मंजुताई निंंबाळकर यांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS