Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचा थंडावा; मात्र शेतकर्यांची चिंता वाढली

अंबाजोगाई प्रतिनिधी - यंदाच्या तीव्र उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना जरी पावसाने दिलासा दिला असला तरी शेतीच्या दृष्टीने हा पाऊस शेतकर्यांची च

साताऱ्याचे जवान विपुल इंगवले यांना उपचारादरम्यान वीरमरण | LOK News 24
ओबीसी आरक्षणाचा पेच कायम
बूस्टर डोस घेतल्यानंतरही ओमायक्रॉनची बाधा

अंबाजोगाई प्रतिनिधी – यंदाच्या तीव्र उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना जरी पावसाने दिलासा दिला असला तरी शेतीच्या दृष्टीने हा पाऊस शेतकर्यांची चिंता वाढवणारा आहे. गेल्या दोन दिवसांपासुन विजेच्या कडकडाटासह पडणारा अवकाळी पाऊस व गारपीठ याचा शेतींच्या पिकांवर परिणाम होत असला तरी मानवाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी अनेक रोगांना आमंत्रण देण्याचे काम या अवकाळी पावसामुळे होत आहे.
सर्वसाधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने कडक उन्हाळा निर्माण करणारे असतात असे   निसर्गाचे सर्वसाधारण चित्र निर्माण होते. परंतु अलिकडे मात्र निसर्गाने आपला लहरीपणा दावण्यास सुरूवात केली. आणि फेब्रुवारी पासूनच अवकाळी पावसाने आपली हजेरी लावण्यास प्रारंभ केला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची हजेरी लागत आहे. हे चित्र सध्यातरी बदलण्यास तयार नाही. हवामान चाखात्याचा अंदाजही अवकाळी पाऊस व गरपीठ या बाबततीत पुढे नेणारा आहे. या सर्व बाबींचा परिणाम शेती व्यवसायावर होत आहे. उभी पिके या पावसामुळे जमीनोदोस्त झाली शेतकर्यांचे प्रचंड नूकसान ही झालेले आहे. एकीकडे शेती व्यवसयाला अधिक उभारी देण्यासाठी शेतकर्यांचे अपार कष्ट आहेत. मात्र दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीठीने शेतकर्याने निर्माण केलेला घास हिरावून घेण्याचा प्रकार होत आहे. शेती व्यवसाय हा जर भक्कमपणे उभा राहिला तर त्याचा आधार सर्वसामान्य जनतेला मिळतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाच्या प्रगतीचे चित्र कुठेतरी थांबत आहे. शेती व्यवसायाबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही अवकाळी पावसाचा परिणाम होत आहे. अनेक रोगांनाही आमंत्रण मिळत असल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी ही घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS