Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  वंचित बहुजन आघाडीतर्फे अभिवादन

बीड प्रतिनिधी - जब तक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा या घोषणांसह विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघ

गावामध्ये आढळून आला 8 फूट लांबीचा अजगर | LokNews24
मराठा समाजाला आरक्षणापासून देवही रोखू शकत नाही
अनिल बोंडे दिवसाही दारू पितात

बीड प्रतिनिधी – जब तक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा या घोषणांसह विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीने विनम्र अभिवादन केले. 14 एप्रिल रोजी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल उभारून भीम अनुयांनाना अल्पोपहाराचे (खिचडी) वाटप करण्यात आले.
बीड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. जयंती सोहळ्यात वंचित बहुजन आघडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्यासह बबन वडमारे, जि. महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, महिला जिल्हाध्यक्ष अँड. अनिता चक्रे, पुष्पाताई तुरूकमाने, संतोष जोगदंड, राहुल वडमारे, प्रा. गणेश खेमाडे, बालाजी जगतकर, अजय सरवदे, सहसचिव पुरुषोत्तम वीर, ता.अध्यक्ष किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन(काका)जोगदंड, मिलिंद सरपते, प्रकाश पवळे, राजेशकुमार जोगदंड, सुशील काकडे, अमर ससाणे, उमेश तुळवे, अमोल वाघमारे, प्रकाश वाघमारे , रोहित वाघमारे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS