Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

भर उन्हात सुध्दा रक्तदात्यांनी केले रक्तदान

हदगाव प्रतिनिधी - हदगाव शहरातील नागसेण नगर मूलबंधुटी बुद्ध विहार येथे 14 एप्रिल 2023 रोजी महामानव,बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या

सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी
मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा ः मंत्री दीपक केसरकर
महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण घेतले माघार

हदगाव प्रतिनिधी – हदगाव शहरातील नागसेण नगर मूलबंधुटी बुद्ध विहार येथे 14 एप्रिल 2023 रोजी महामानव,बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागसेन नगर येथील नवयुवक मित्र मंडळ मूलगंध कुटी बुद्ध विहार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जीवराज डापकर हदगाव तसेच कार्याध्यक्ष हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बी.के.निळे यावेळी उपस्थित होते. तर हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार व डॉ. बी.के.निळे (डोंगरगावकर) यांनी  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विष्णुपुरी नांदेड यांच्या बोर्डाची शित-फीत कापून उद्घाटन केले व यावेळी रक्तदात्यांनी उन्हाचा पारा 40 ते 45 अंशावर असताना सुद्धा नागसेन नगर नवयुग मित्र मंडळाच्या वतीने रक्तदात्यांनी रक्तदान केले गेले. रक्तदान करणारे रक्तदाते खालील प्रमाणे डॉ.बी.एम.नरवाडे सर,भाऊराव साळवे,अनिकेत नरवाडे, मधुकर राठोड,सुनील खिल्लारे,सचिन कांबळे,प्रज्वल वाठोरे,अरविंद वानखेडे,आर्यन शिनगारे,जय पंडित,प्रदीप उबाळे,निहार शिंगणकर,प्रसन्नजीत अवचार या रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. तसेच हदगाव तहसीलचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत हदगावचे तलाठी जे.एन.मुगल हे सुद्धा यावेळी उपस्थित  होते. हदगाव तालुक्यात रक्ताची चळवळ नेहमीच जागृत असून यावेळी अनेकांनी पुढाकार घेतला. तसेच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी नवयुवक मंडळ नागसेन नगर या नवयुवकांना डि.जे. न लावता सामाजिक उपक्रम राबवावे यासाठी त्यांना सूचना केल्या होत्या त्यांच्या या सूचनाचे पालन करत नागसेन नगर, मूलगंध कुटी बुद्ध विहार येथील नवयुवक मित्रमंडळींनी भोजनदान व रक्तदान असे सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी नागसेन नगर नव युवक मित्र मंडळाचा सत्कार यावेळी केला. विविध सामाजिक उपक्रम करून तसेच नागसेन नगर नवयुवक मित्र मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. या सुज्ञ उपक्रमाची चर्चा हदगाव शहरात व नगरवासीयात पाहावयास मिळत होती.  यावेळी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विष्णुपुरी नांदेड चे डॉ.आकाश पवार(रक्त संक्रमण अधिकारी),बालाप्रसाद भालेराव,हितेश कुमेर, सदानंद कुरा,नागेश कुराडे,लक्ष्मण येळणे, सय्यद अब्दुल हे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तसेच बुलगंध कुटी बुद्ध विहार नागसेन नगर येथिल प्रतिष्ठित नागरिक महिलावर्ग व बालक-बालिका यावेळी उपस्थित होते.

COMMENTS